प्रेगनंचय मधे काय काय खावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:07

गर्भधारणेदरम्यान तुमचे डायट कसे असावे? मग बाळाच्या योग्य विकासासाठी या गोष्टींचा करा आहारात समावेश

स्त्रिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे आई होणं. गरोदरपणात आईच्या खाण्याची जास्त काळजी घ्यावी लागते. बाहेरील जंक फूड किंवा बाहेरचे अन्न जास्त खाल्ल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात काय खावे काय खावू नये याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असते. चला तर मग या काळात कोणती काळजी घेणं गरजेचं असते याची माहिती घेऊयात.

प्रत्येक महिलेच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आई होणं. एका नव्या जीवाला जन्म देताना महिलांना काही गोष्टींचा काळजी घेणं गरजेचं असते. या काळात जास्त महत्त्वाचा असतो तो आहार. या काळात तुम्ही आहारात काय खाताय याचा परिणाम बाळावर होत असतो.

त्यामुळे याकाळात कोणतीही गोष्टी खाताना काही काळजी घेणं महत्त्वाचे असतं. या काळात महिलांना अनेक पदार्थ खाऊ वाटतात त्यांना 'डोहाळे' असं म्हणतात पण या काळातही काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात गरोदरपणात तुमचा डाएट प्लॅन काय असावा?

सतत काही तरी खात राहा
या काळात सतत काहीतरी खाणं महत्त्वाचे ठरतं. यामुळे महिलांमध्ये अपचन आणि उलटीची समस्या कमी होते. त्याप्रमाणे तुमचे पोट भरलेले राहिल. तुम्हाला मुड स्विंगही होणार नाही. तुम्हाला फ्रेश फिल होईल.


फास्ट फूड, जंक फूड पासून लांबच राहा
गर्भवती महिलांनी फास्ट फूड, जंक फूड जास्त खाऊ नये. यामध्ये असणारे मसाले, रंग बाळाच्या त्वचेवर परिणाम करतात. त्याच प्रमाणे या काळात तळलेले, भाजलेले आणि तिखट-मसालेदार खाणे टाळाच. त्याचा थेट परिणाम बाळावर होतो.


पाणी महत्त्वाचे
गर्भवती महिलेने दररोज रोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे तुम्ही भाज्यांचे सूप आणि फळांचा रस देखील घेऊ शकता. गरोदरपणात उपवास करणं टाळा आणि कच्चे दूध पिऊ नका याचा परिणाम बाळावर होतो.


हिरव्या पालेभाज्यांचे सेवन
हिरव्या पालेभाज्यांचे जास्ती जास्त सेवन करणे फायद्याचे असते. त्यामुळे या काळात हिरव्या भाज्यांचे सेवन करा. या काळात तुम्ही अंकुरलेली कडधान्ये, गूळ आणि तीळाचा देखील समावेश आहारात करु शकता. कॅल्शियमसाठी भिजवलेले काजू खा आणि अंजीर खावू शकता. तर प्रोटीनसाठी तुम्ही दूध, शेंगदाणे, चीज, काजू, बदाम, डाळी, मांस, मासे, अंडी खाऊ शकता.


धूम्रपान आणि मद्यपान करु नका
गरोदरपणामध्ये महिलेने धूम्रपान आणि मद्यपान करु नये. या गोष्टी गरोदरपणात मोठी समस्या निर्माण करू शकतात. गरोदर राहण्याआधी वा गरोदरपणात धूम्रपान आणि मद्यपान करु नये. या गोष्टीचा परिणाम थेट बाळावर होतो. त्याच प्रमाणे दिवसातून 500 मि.ग्रा पेक्षा जास्त मात्रामध्ये कॅफीन घेतल्याने गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info