गर्भधारणा टाळण्यासाठी मासिक पाळीनंतर किती दिवस सुरक्षित आहेत?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:16

गर्भधारणा टाळायची असेल तर शारीरिक संबधांसाठी सुरक्षित काळ आणि पद्धती कोणत्या?

जर तुम्हाला आताच पालक बनायचे नसेल तरीही सेक्स लाईफ एन्जॉय करायची असेल तर, काही गोष्टींविषयी तुम्हाला माहिती हवी. त्यासाठी तुम्हाला मासिक पाळीच्या चक्रामध्ये अशीसुद्धा वेळ असते. ज्यावेळी सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याच्या शक्यता खूपच कमी असतात. हा सुरक्षित काळ तुमच्यासाठी गर्भनिरोधक म्हणूनच काम करतो. या सुरक्षित काळाचा अंदाज कसा लावायचा ते वाचा

जर तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या चक्राला व्यवस्थित कॅल्कुलेट केलं. तर तुम्हाला सेक्ससाठी सुरक्षित काळाचा अंदाज येईल. परंतु महिलांची मासिक पाळीची तारिख मागे-पुढे होऊ शकते. त्यामुळे सेक्स केल्याने गर्भधारणा होणार नाहीच याची पूर्ण शाश्वती देता येत नाही.

sex period

मासिक पाळीच्या पहिल्या दिवसांपासून ते पुढील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसांपर्यतचे चक्र कॅल्कुलेट केले जाते. साधारणपणे हे मासिक चक्र 28 दिवसांचे असते. यामध्ये 14 वा दिवस ओवलुशेनचा असतो. म्हणजे यादरम्यान गर्भधारणा होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. महिलेच्या शरिरात पुरुषाचे वीर्य तीन ते पाच दिवसांपर्यंत असते. आणि अंडी 12 ते 24 तासांपर्यंत जिवंत राहते. त्यामुळे ओवलुशेनच्या 5 दिवस आधी किंवा ओवलुशेनच्या दिवशी सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

जर तुम्ही सुरक्षित काळात गर्भनिरोधकाचा प्रयोग करीत असाल तर, गर्भधारणेची शक्यता आणखी कमी होते. म्हणून गर्भधारणेपासून बचावासाठी कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधकांचा जरूर वापर करा.

विड्रॉ टेक्निक : गर्भधारणेपासून बचावासाठी अनेकजण विड्रॉ टेक्निकचा वापर करतात. यामध्ये पुरूष पार्टनर इजेकुलेशनच्या बरोबर आधी योनी बाहेर स्पर्म रिलीज करतो. यामुळे नैसर्गिस संबधाचाही आनंद मिळतो. आणि गर्भधारणेपासूनही बचाव होतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info