गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा?pregnancytips.in

Posted on Thu 25th Oct 2018 : 04:38

या आयुर्वेदीक उपायांनी गर्भधारणेतील अडथळे होतील दूर !

जर बाळासाठी खूप प्रयत्न करुन देखील अपयश येत असेल तर या आयुर्वेदिक उपचारांची मदत घेऊन नक्की पहा.

अनेक जोडप्यांना आजकाल आई-बाबा होण्यासाठी खुप प्रयत्न करुन देखील यश मिळत नाही.आजकाल हे प्रमाण वाढल्याने अनेक कुटूंबासांठी ही चिंतेची बाब होत आहे.वंधत्वावर अनेक उपाय योजना उपलब्ध आहेत.मात्र पांरपारिक औषधाच्या माध्यमातून कर-यात येणा-या उपचारांपेक्षा आयुर्वेदिक उपचारांचा वंधत्वावर चांगला परिणाम दिसून येतो.शिवाय या उपचारांचे दुष्परिणाम देखील कमी असतात.

नागार्जुन आयुर्वेदाचे डॉ.रणजित सी मेनन यांच्याकडून जाणून घेऊयात वंधत्वावर आयुर्वेदात कसे उपचार केले जातात.नक्की वाचा : या | 5′ व्यवसायातील पुरूषांमध्ये इन्फ़र्टीलिटीचा धोका अधिक असतो !

आयुर्वेदामध्ये वंधत्व उपचारांच्या प्रकियेत प्रथम स्त्रीचे योग्य ओव्हूलेशन,निरोगी स्त्रीबीज आणि पुरुषांच्या शुक्रांणूंच्या योग्य संख्येवर भर देण्यात येतो.त्याचप्रमाणे या उपचारांमध्ये स्त्री व पुरुष या दोघांच्याही प्रजनन अवयवांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
मासिकपाळी की गर्भपात - नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
स्तनपानाच्या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे का?

आयुर्वेदानूसार एखाद्या व्यक्तीचे आरोग्य या गोष्टींवर अवलंबून असते-

बायो-स्टॅटीक एनर्जी अथवा त्याच्या शरीरातील वात,पित्त व कफ या दोषांचे संतुलन

सप्त धातू अथवा शरीरातील पेशींचे सात थर
by Taboola
Sponsored Links
You May Like
Skyrocket your SDE CareerScaler Academy

This term plan gives `3.19 lac premium back at no extra cost*^Max Life Insurance Calculator

पचनसंस्था

पचनसंस्थेचे योग्य कार्य

शरीर-मन-आत्मा यांचे संतुलन व आंतरिक शांती

जेव्हा चुकीचा आहार व जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे या गोष्टीमध्ये असंतुलन होते तेव्हा अनेक प्रकारचे विकार व आरोग्य समस्या निर्माण होतात.परंपरागत उपचारांमध्ये जोडप्यांवर वंधत्व या समस्येसाठी वैयक्तिक रित्या उपचार करण्यात येतात.मात्र आयुर्वेदामध्ये गर्भधारणेतील समस्येवर दोघांवर एकत्रित उपचार करण्यात येतात. जाणून घ्या आयुर्वेदीक डिटॉक्स डाएटने कसे कराल शरीर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी !

गर्भधारणेमधील आयुर्वेदिक शास्त्र-

आयुर्वेद शास्त्रानूसार गर्भधारणा ही स्त्री व पुरुष यांच्या शूक्राणू,बीजांडे व गर्भाशयाच्या आरोग्यावर अवलंबून असते.पुरुष व स्त्री या दोघांच्याही प्रजनन अवयवांचे आरोग्य हे त्यांच्यामध्ये निर्माण होणा-या शुक्रधातूवर किंवा शरीरात निर्माण होणा-या प्रजनन पेशींवर अवलंबून असते.योग्य मेटाबॉलिक क्रिया व प्रभावी पचन क्रियेमुळे खाल्लेल्या अन्नाचे शरीरातील द्रवपदार्थ,रक्त,स्नायू,चरबी,हाडे,अस्थिमज्जा व शुक्र पेशी यामध्ये रुपांतर होण्यास मदत होते.स्त्रीयांमध्ये या शुक्रपेशींमुळे मासिक पाळीत बीजांडे व पुरुषांमध्ये शूक्राणू निर्माण होतात ज्यामुळे त्यांना सेक्ससाठी चालना मिळते.या शुक्रधातूचे आरोग्य शरीरातील इतर टिश्यूज व मेटाबॉलिक फंक्शनच्या आरोग्यावर अवलंबून असते.

सहज गर्भधारणेसाठी काय करावे?

स्त्री व पुरुष याच्या फर्टिलीटीवर शारिरीक,मानसिक स्थिती व वातावरणातील घटक अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.

यासाठी आयुर्वेदानुसार फर्टिलीटीवर परिणाम करणारे घटक जाणून घ्या-

प्रजनन अवयवांचे आरोग्य-

गर्भधारणा सहज होण्यासाठी स्त्रीचे गर्भाशय व पुरुषांचे शुक्राणू कारणीभूत असतात.जर पुरेसे पोषण मिळालेे नाही किंवा पचनसंस्थेत बिघाड असेल व शरीरात टॉक्सिन्स जमा झाले असतील तर गर्भाशय व शुक्राणूंवर त्याचा विपरत परिणाम होतो.नक्की वाचा | आपन मुद्रा | – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !

भावनांचा अभाव-

प्रेम नसलेल्या अथवा आकर्षण वाटत नसलेल्या व्यक्तीसोबत सक्तीने सेक्स केल्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.त्याचप्रमाणे अती सेक्शूल अॅक्टीव्हिटीज मुळे देखील शुक्रधातूचा क्षय होतो व वंधत्व येण्याचा धोका वाढतो.

अनियमित आहार-

अती तिखट,खारट व प्रकिया केलेले पदार्थ खाल्याने पित्त वाढते व शुक्राणू कमी होतात. जाणून घ्या शरीर नैसर्गिकरीत्या डीटॉक्स करा या | 5′ पदार्थांंनी !

कामवासना कमी होणे-

खूप काळापासून सेक्सची इच्छा दाबून ठेवल्याने वीर्यअवरोध होण्याची शक्यता असते ज्यामुळे वीर्याचे प्रमाण व कामवासना कमी होते.

इनफेक्शन-

प्रजनन पेशींना इनफेक्शन झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले तर वंधत्व येण्याचा धोका असतो.

यावर काय उपचार करतात -

आयुर्वेदिक उपचारांमध्ये प्रथम विषद्रव्ये बाहेर टाकून शरीराचे शुद्धीकरण केले जाते त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीेेंचे योग्य पोषण होऊन त्यांचे कार्य सुधारले जाते.सहाजिकच त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते.वंधत्व दूर करण्यासाठी जोडप्यांना प्रथम पंचकर्म उपचार दिले

पंचकर्म उपचार -

पंचकर्म उपचारांमध्ये शरीरातील टॉक्सीन्स बाहेर टाकले जातात.शरीर शुद्धीकरण झाल्यावर पचनसंस्था सुक्ष्म पातळीवर सुधारण्यात येते.त्यामुळे शरीरातील सर्व पेशींचे कार्य सुधारते व त्यांना योग्य पोषण मिळते.

त्यामुळे शुद्ध झालेल्या पेशींना पुन्हा व्हिटॅमीन,मिनरल्स मिळू लागतात.शरीराला हॉर्मोन्स व इन्झायमी सह पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे शरीरातील पेशींचे कार्य सुधारते व शरीराची सेल्फ हिलींग क्षमता वाढते.सहाजिकच त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते व गर्भधारणा रहाण्याची शक्यता देखील वाढते.

पंचकर्माच्या उपचारांची पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी कमीतकमी २१ दिवसांची गरज असते.ही प्रक्रिया तीन टप्प्यात करण्यात येते.यशस्वी गर्भधारणेसाठी आहारात हे बदल कराच

१.पुर्व-प्रक्रिया-

या प्रक्रियेत निरनिराळ्या प्रकारचे मसाज व औषधे दिली जातात.ज्यामुळे घामाद्वारे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.

२.महत्वाची प्रक्रिया-

यात निरनिराळ्या पद्धतीने शरीरातील टॉक्सीन्स नष्ट केले जातात.

स्नेह बस्ती किंवा विशिष्ठ तेलांचा मसाज

काश्य बस्ती किंवा आयुर्वेदिक काढे पिण्यास देऊन शरीर शुद्ध करणे

विरेचनम् किंवा कोठा साफ करुन टॉक्सीन्स बाहेर काढणे

नस्यम् किंवा नाक साफ करणे

वमन - किंवा उलटी द्वारे पोट साफ करणे

३.शेवटची प्रक्रीया-

ही या उपचारांची शेवटची प्रक्रीया असते.ज्यामध्ये शरीरात सकारात्म ऊर्जा वाढते व शरीर-मन-आत्मा यांचे सतुंलन होते.त्यामुळे मानसिक स्वास्थामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते.

असे असले तरी केवळ पंचकर्म उपचारांच्या माध्यामातूनच वंधत्वावर उपचार करण्यात येतात असे नाही.जोडप्यांच्या आरोग्य समस्यांचा विचार करुन पंचकर्मासोबत इतर उपचार देखील त्यांच्यावर करण्यात येतात. ( नक्की वाचा : अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय )

यशस्वी गर्भधारणेसाठी इतर काही उपचार-

अभ्यंग-यामध्ये त्रिदोषाचे सतुंलन राखण्यासाठी उपचारात्मक तेलाचे मसाज केले जातात.यासाठी वापरण्यात येणारे तेल निरनिराळी औषधे व औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात येतात.

स्नेहपानम - या उपचारांमध्ये रुग्णाला औषधी तुप पिण्यास देण्यात येते.ज्यामुळे आतड्यांच्या समस्या दूर होतात व पचनसंस्था सुरळीत होऊन आरोग्य सुधारते.

Podikkizhi -यामध्ये औषधी वनस्पतीचे चुर्ण दिले जाते.ज्यामुळे शरीरातील ताण दूर होतो,रक्ताभिसरण सुधारते,विषद्रव्ये बाहेर टाकली जातात,स्नायूं व टीश्यूजना आराम मिळतो,शरीरातील जास्तीचा कफ कमी होतो.या पद्धतीमुळे शरीरातील घाम व विशद्रव्ये बाहेर पडतात त्यामुळे त्रिदोष सतुंलित राहतात

Elakizhi-यामध्ये औषधी वनस्पती व पानांचा मसाज केला जातो.एरंड,अर्क,निरगुंडी,रस्न,नारळांची पाने,लिंबू या वात कमी करणा-या वनस्पतींच्या ताजी पाने तळून एका कापडात गुंडाळतात.त्या गाठोड्याला गरम औषधी तेलात बूडवून त्याने शरीराला मसाज केला जातो.या उपचारांचा निरनिराळ्या आर्थ्राटीस,स्पॉडीलाईटीस,पाठदुखी व दाह कमी करण्यासाठी उपयोग होतो.मसाजमुळे बिघडलेल्या अवयवांचे रक्ताभिसरण सुधारते व घामाच्या माध्यामातून विशद्रव्ये बाहेर टाकली जातात.

Njavara-गरम तांदूळ अथवा लाल तांदूळ दूध व औषधांसोबत कापडांच्या माध्यमातून पिळून घेतात व त्या कापडाच्या पिशवीने शरीराला मसाज करतात.याचा शरीराला ३० ते ४० मिनीटे मसाज केला जातो.तांदूळ थंड झाल्यावर शरीर स्वच्छ करुन गरम तेल लावले जाते.

Pizhichil- यामध्ये संपुर्ण शरीराला कोमट औषधी तेलाने मसाज करुन स्टीम बाथ देतात.यामुळे शरीराचे निरनिराळ्या आजारपणापासून संरक्षण होते व शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढून शरीर निरोगी होते.संधीवात,आर्थ्राटीस,अर्धांगवायु व लैंगिक दुर्बलतेवर या उपचारांचा चांगला परिणाम होतो.

Snehavasthy-वात सतुंलित करण्यासाठी स्नेहबस्ती ही ऑईल थेरपी देण्यात येते.आयुर्वेदानूसार वात हा मोठ्या आतड्यांमध्ये असतो.यासाठी औषधी तेलांचा एनिमा देऊन तो शांत करण्यात येतो.त्यामुळेे मेटाबॉलिजम सतुंलित होते व पचनक्रिया सुधारते व शरीराचे आरोग्य आपोआप सुधारु लागते.

Avagaham-हे एक प्रकारचे सीट बाथ आहे ज्यामध्ये अवगहम टबमध्ये औषधी वनस्पती टाकून बसण्यास सांगितले जाते.यात टबमध्ये टाकलेल्या औषधी तेल व औषधी वनस्पती रुग्णाच्या प्रकृतीनूसार निवडण्यात येतात.

Kashayavasthy-या उपचारांमध्ये पोट साफ करण्यासाठी रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीनूसार मध,औषधी पेस्टचा एनिमा दिला जातो.यामुळे वात कमी होतो व रुग्णाला आरोग्य लाभते.

Lepanam-काही आरोग्य परिस्थितीत या उपचारांमध्ये काही औषधी लेप संपुर्ण शरीर अथवा काही भागावर लावण्यात येतात.हे लेप सुकल्यावर काढण्यात येतात.या लेपांचे थर हे प्रत्येकाच्या आरोग्य स्थितीनूसार कमी किंवा जास्त लावण्यात येतात.संवेदनशील त्वचा व उष्णता सहन न होणा-या लोकांनी हे उपचार करणे टाळावे.

इवनिंग थेरपी-थैलधरा अथवा थर्कधरा या आरामदायक व विशेष मसाज थेरपीमुळे शरीरातील इमोशनल टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात.

सामान्यत: हे उपचार व औषधे रुग्णाचा विकार व शरीर प्रकृतीनूसार निवडण्यात येतात.त्यामुळे वंधत्वावर कोणता उपचार करावा हे त्या जोडप्याच्या आरोग्याची तपासणी करुन ठरविण्यात येऊ शकते. यशस्वी गर्भधारणेसाठी | 8′ हॉट सेक्स पोजिशन्स !! नक्की ट्राय करा.

solved 5
wordpress 5 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info