गर्भ कधी तयार होतो?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 12:39

हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे.

स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे ३८ आठवड्यांत प्रसूती होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे ४० आठवडे इतका येतो. सस्तनी प्राण्यांच्या गर्भावस्थांपैकी मानवी गर्भावस्थेचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे. गर्भधारणा लैंगिक समागमातून किंवा सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञानामार्फत साधली जाऊ शकते.

गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे भ्रूण होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते.[१][२] प्रसवपूर्व विकासाच्या विविध अवस्थांचा निर्देश सुलभ व्हावा म्हणून मानवी गर्भावस्था तीन तिमाहींच्या कालावधीत विभागली जाते. पहिल्या तिमाहीत गर्भस्राव (भ्रूणाचा किंवा गर्भाचा नैसर्गिक मृत्यू) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुसऱ्या तिमाहीत गर्भाची वाढ सहजगत्या पाहिली जाऊ शकते. तिसऱ्या तिमाहीचा प्रारंभ हा जवळपास जीवनक्षमतेचा, अर्थात वैद्यकीय मदतीसह किंवा मदतीशिवाय गर्भाशयाबाहेर गर्भ जगू शकण्याच्या क्षमतेचा बिंदू असतो.[३]
परिभाषा

वैज्ञानिक परिभाषेत गर्भावस्थेला ग्रॅव्हिडिटी अशी एक संज्ञा आहे. ती लॅटिन भाषेतील "जड" या अर्थाच्या धातूवरून आलेली आहे. गरोदर स्त्रीला इंग्रजीत ग्रॅव्हिडा असेही म्हटले जाते. पॅरिटी (प्रजकता) ही संज्ञा (लघुरूप पॅरा‌) स्त्रीने जितक्या वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे त्या संख्येसाठी वापरली जाते. प्रजकता मोजताना एकाच वेळी असलेली एकाहून अधिक गर्भांची गर्भावस्थाही "एक" म्हणूनच मोजली जाते आणि सामान्यतः प्रजकतेतत मृतगर्भजन्मांचाही समावेश असतो. वैद्यकीय परिभाषेत कधीही गरोदर न झालेल्या स्त्रीला नलिग्रॅव्हिडा (अगर्भा) (वांझ) असे आणि पहिल्यांदाच गरोदर असलेल्या स्त्रीला प्रायमिग्रॅव्हिडा (पहिलटकरीण) असे म्हणतात. ज्या स्त्रीमध्ये गर्भावस्था कधीही २० आठवड्यांपलीकडे गेलेली नाही तिला नलिपॅरा (अप्रजका) असे म्हणतात.
गर्भारकाळ

बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात.

मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.पूर्ण गर्भाची वाढ होण्यास सु. चाळीस आठवड्यांचा कालावधि आवश्यक आहे. हा चाळीस आठवड्यांचा काळ शेवटच्या मासिकपाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यात येतो. कारण मासिक पाळी आली नाही म्हणजे त्या महिन्याच्या गर्भचक्रामधील बाराव्या ते चवदाव्या दिवशी अंडमोचन आणि निषेचन झालेले असते. सामान्यपणे गर्भावस्थेचे तीन तीन महिन्यांचे तीन टप्पे मानण्यात येतात.

पहिली तिमाही- पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते.

दुसरी तिमाही- गर्भावस्थेचा १३ ते २७ आठवड्यांचा काळ

तिसरी तिमाही- गर्भावस्थेचा २८ ते ४० आठवड्यांचा काळ

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info